मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही:राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही, फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर झाल्याचाही दावा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या ‘धमकी व ऑफर’च्या दाव्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. “सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल जरांगेंना पाठवला जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ…