बँक काय तुमच्या बापाची आहे का?:शेतकऱ्यांना अरेरावी करणे बँक मॅनेजरला महागात, 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्यक्षाने लगावली कानशिलात
कर्जमाफी योजनेची विचारपूस करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करत “बँक काय तुमच्या बापाची आहे का?” अशी अरेरावीची भाषा करणाऱ्या बँक मॅनेजरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने थेट बँकेतच कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा खळबळजनक प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड…