Headlines

50 फूट पाण्यात बिबट्याचा ‘जीवनसंघर्ष’:वांजुळपोईत 100 फुटांच्या‎विहिरीत पडला; पाईपच्या‎ आधाराने वाचला‎




राहुरी तालुक्यातील वांजुळपोई शिवारात दादासाहेब नाना कोळपे यांच्या शेतातील सुमारे १०० फूट खोल व ५० फूट पाणी असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उशिरा घटनास्थळी पोहोचून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. वांजुळपोई परिसरात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, याबाबत वनविभागाकडे तक्रारी करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नुकसानीची चौकशी करण्यासाठी अधिकारी वेळेवर फिरकले नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या भागात नदीकाठ आणि ऊसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिसरात सुमारे पाच ते सहा बिबटे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात उर्वरित पान ४ विहिरीत पडलेला बिबट्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *