Headlines

टाळ-मृदंगाचा निनाद अन् विठूनामाचा गजर:गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडी सोहळा!

कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोच्च स्थान असून विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचे महत्त्व लहानपणापासूनच रुजावे तसेच गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि…

Read More

गणितीय कौशल्य, बौद्धिक क्षमता विकसित करणे आवश्यक:आमदार अमोल खताळ यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, गणितीय कौशल्य आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने गेल्या ४३ वर्षांपासून अबॅकसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण केली आहे. ५० व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन ही केवळ स्पर्धा नसून भारतीय शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी चळवळ आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ…

Read More

वर्ध्यात मध्यरात्री थरार:पुरात वाहून गेलेल्या तरुणाला झाडाने दिले जीवदान; रात्रभराच्या थरारानंतर पहाटे सुखरूप बचाव

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात गुरुवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली. अल्लीपूर-टाकली मार्गावरील यशोदा नदीला आलेल्या पुरात अक्षय माटे नावाचा तरुण अचानक पाण्याच्या वेगात वाहून गेला. पुराच्या प्रचंड वेगामुळे तो तब्बल १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत वाहून गेला, मात्र प्रसंगावधान राखत त्याने एका मोठ्या झाडाला घट्ट पकडले आणि त्यावर चढून स्वतःचे प्राण वाचवले….

Read More

श्रीरामपूर-बेलापूर मार्गावर पुन्हा सुरू झाली वृक्षलागवड:‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग, वृक्षप्रेमींमध्ये समाधान, मात्र झाडे जगवण्याचे आव्हान‎

अरुंद रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ हा सहा किलोमीटरचा रस्ता चौपदरी करणे आवश्यक होते. मात्र, या रस्ता रुंदीकरणादरम्यान वडाच्या जुन्या झाडांसह शेकडो झाडे तोडली गेली. त्यानंतर प्रशासनाने झाडे लावली खरी, परंतु पाणीटंचाई व दुर्लक्षामुळे रखरखत्या उन्हात ती सर्व झाडे जळून खाक झाली होती. या गंभीर प्रकाराबाबत ‘दिव्य…

Read More

जळगावच्या चोपड्यात मुसळधार पावसाचा तडाखा:रत्नावतीसह नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागली, वीजपुरवठा खंडित

चोपडा तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून ते मध्यरात्रीच्या पावसाने चांगली बॅटिंग करून सर्वत्र तालुका ओलाचिंब केला आहे. अखंडपणे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुका अक्षरशः झोडपून निघाला आहे. ३० जुलैच्या मध्यरात्रीत ३१ जुलैच्या पहाटेपर्यंत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर लहान-मोठे नाले आणि नद्यांना पूर आल्याने जनजीवन काही…

Read More

कॅनडामध्ये 500 पंजाबी विद्यार्थ्यांवर हद्दपारीची टांगती तलवार:वादळ-पावसात रस्त्यावर ठाम; मुली नैराश्यात, म्हणाल्या- शिक्षणावर ₹20 लाख खर्च

कॅनडामध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट (PGWP) चे अर्ज फेटाळल्यानंतर सुमारे ५०० पंजाबी विद्यार्थ्यांवर हद्दपारीची टांगती तलवार आहे. याविरोधात सुमारे १,००० भारतीय विद्यार्थी गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलन करत आहेत. पाऊस, कडक ऊन आणि खराब हवामानाची पर्वा न करता विद्यार्थी अल्बर्टा येथील कॅलगरीमध्ये रस्त्यांवर ठाण मांडून आहेत. कॅनडाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून उत्तर मागण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी २९ जुलैपासून उपोषणही सुरू…

Read More

यवतमाळमधील अडान नदीच्या पुरात कार वाहून गेली:आईसह 2 मुली बेपत्ता, झाडाच्या आधारे पती बचावला; युद्धपातळीवर शोध सुरू

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली येथे अडान नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रवाहात इर्टिगा कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेसह दोन मुली बेपत्ता झाल्या असून, पतीने झाडाचा आधार घेत थरारक बचाव केला. प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. आईसह दोन मुली बेपत्ता ही घटना शुक्रवार (दि. ३१ जुलै) रोजी रात्री १२ वाजताच्या…

Read More

बुवासिद्ध देव यात्रा:कावड निघाली… राहुरी दुमदुमली! कावड, झेंडा मिरवणुकीसह धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी‎

राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देवांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण राहुरी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला….

Read More

सेन्सेक्स 50 अंकांनी वाढून 78,050 वर:निफ्टीमध्येही 30 अंकांची वाढ, 24,350 वर व्यवहार करत आहे; आशियाई बाजारातही तेजी

आज म्हणजेच 31 जुलै रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 50 अंकांनी वाढून 78,050 च्या पातळीवर उघडला. निफ्टीमध्येही 30 अंकांची वाढ झाली, तो 24,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही तेजी 30 जुलै रोजी अमेरिकन बाजारात तेजी होती 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹5,673 कोटींचे शेअर्स खरेदी केले टीप: FIIs आणि DIIs च्या निव्वळ खरेदी/विक्रीचे…

Read More

स्वामी समर्थ मंदिराचा विकास:अक्कलकोट कॉरिडॉरचा 500 कोटींचा आराखडा सादर करा : फडणवीस

अक्कलकोटच्या विकासासाठी अवघ्या २४ तासांत प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची (डीपीआर) तयारी पूर्ण करून तो तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश म्हाडा प्रशासनाला दिले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी…

Read More