![]()
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, गणितीय कौशल्य आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने गेल्या ४३ वर्षांपासून अबॅकसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण केली आहे. ५० व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन ही केवळ स्पर्धा नसून भारतीय शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी चळवळ आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी खताळ बोलत होते. यावेळी आयपीएस परीक्षा उत्तीर्ण ऋतुजा गायकवाड, अधिव्याख्याता डॉ. गणेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक विद्या झाडे, ॲड. मिनल देशमुख, केंद्रप्रमुख आशा घुले, विश्वनाथ खिल्लारी, रोहिणी खतोडे, मुख्याध्यापक गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा अकॅडमीच्यावतीने सन्मान करण्यात आला. वंदना थोरात यांनी स्वागत व प्रास्ताविकातून अकॅडमीचा ४३ वर्षांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास, विद्यार्थी घडविण्याची परंपरा आणि राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय यशाचा आढावा मांडला. अकॅडमीच्या मार्गदर्शिका डॉ. कल्पना घडेकर-कार्ले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अबॅकस डेमो प्रात्यक्षिकात हजारो विद्यार्थ्यांनी अवघ्या काही क्षणांत अवघड गणिती उदाहरणे सोडवून उपस्थितांना अचंबित केले. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, वेग आणि गणितीय अचूकता पाहून उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. एव्हरेस्ट आदर्श शिक्षिका पुरस्काराने रोहिणी शिंदे व वैशाली साळुंखे, एव्हरेस्ट स्टार टीचर अवॉर्डने ननिका थोरात, रायझिंग वुमन स्टार अवॉर्डने विद्या देशमुख, तर एव्हरेस्ट गॅलेक्सी टीचर अवॉर्डने वंदना थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले तर अशोक घडेकर यांनी आभार मानले. यावेळी अकॅडमीतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवले विजेतेपद या स्पर्धेत लहान गटामध्ये वेदश्री पाटील, देवांश बेडवाल, श्रेया गाडगे, प्रतीक भोसले, ऋषिकेश गीते, मानसी इरांडे, शौर्य पोदार, गार्गी दाभाडे, श्लोक शिंदे, आरोही शेळके, शार्विल कवडे, आर्यन लांडे, जय गाडगे, वेदांत वाडिया, कस्तुरी माने, वैभवी कोरडे आणि कृष्णा दिघे यांनी चॅम्पियनशिप पटकावली. मोठ्या गटात सर्वज्ञ वाळे, आराध्या तरहाळ, शिवम देशमुख, अपेक्षा एरंडे, कस्तुरी आरोटे, वेदांत सौर, स्वरांगी हसे, आराध्या वर्पे, अवनी मरकड, इशिता गडाख, स्वरा गुंजाळ आणि अमिरा शेख यांनी उत्कृष्ट यश संपादन करत विजेतेपद पटकावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले तर अशोक घडेकर यांनी आभार मानले.
Source link
गणितीय कौशल्य, बौद्धिक क्षमता विकसित करणे आवश्यक:आमदार अमोल खताळ यांचे प्रतिपादन