पंढरीची वारी हा आत्मशुद्धी साधण्याचा खरा मार्ग:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची उपस्थिती
“वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही, तर मनातील अहंकार, मत्सर, लोभ आणि द्वेष दूर करून आत्मशुद्धी साधण्याचा मार्ग आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी संतांनी दिलेला समता, प्रेम, सेवा आणि नामस्मरणाचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. विठ्ठलभक्ती ही माणसाला माणुसकी शिकवते. वारीत प्रत्येक वारकरी हा समान असतो. जात, पात, श्रीमंती-गरीबी यापलीकडे जाऊन…