पाडळीत ठाकरवाडी रस्त्यावर चिखल:ग्रामस्थ, विद्यार्थी त्रस्त; राया फाउंडेशनसह पालकांचे प्रशासनाला निवेदन
सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील मारुती मंदिरापासून ठाकरवाडी वस्तीकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसामुळे तो पूर्णपणे चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः जिल्हा परिषद…