Headlines

शाहरुख चित्रपटांचा विचार करत नव्हता:रेणुका शहाणे म्हणाल्या- मोठा टीव्ही स्टार होता, त्याला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी व्हायची

थिएटरमधून अभिनयाची सुरुवात, पीएच.डी. सोडून अभिनयाला करिअर बनवणे, शाहरुख खानसोबत ‘सर्कस’मध्ये काम करण्याचा अनुभव, दिग्दर्शनाची नवी इनिंग आणि सोशल मीडियावर स्पष्ट मतं. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना रेणुका शहाणे यांनी करिअरचे अनेक किस्से सांगितले. त्यावरून त्यांनी लोकप्रियतेपेक्षा चांगल्या कामाला महत्त्व दिल्याचे स्पष्ट होते. प्रश्न: तुमच्या अभिनय प्रवासाची सुरुवात कशी झाली? लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं का?…

Read More

नो एन्ट्रीत घुसलेल्या ट्रकची दुचाकीला धडक:उच्चशिक्षित तरुणीसह मावशीचा जागीच मृत्यू, राजापेठेत गद्रे चौकातील उड्डाणपुलावर अपघात चिरडणाऱ्या ट्रकला नंबर प्लेट नव्हती‎

. शहरातील राजापेठ परिसरातील गद्रे चौकातील उड्डाणपुलावर एका बेलगाम ट्रकने काळजाचा थरकाप उडवणारा तांडव घातला. नो एन्ट्री असतानाही नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या या ट्रकने एका दुचाकीला धडक देवून २७ वर्षांच्या उच्चशिक्षित तरुणीसह तिच्या मावशीला चिरडले. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात मंगळवारी २८ जुलैला दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास घडला….

Read More

दर्जेदार ऊसाचा वाण दिल्यास गा‌ळपात शेतकऱ्यांना लाभ:चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी दिली माहिती‎

राजवी ॲग्रो पॉवर प्रा.लि. आलेगाव बु. (ता. माढा) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त रोलर पूजन सोहळा संपन्न झाला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या शुभहस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत होते. यावेळी बोलताना अध्यक्ष शिवाजीराव सावंत म्हणाले, “शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस दिल्यास कारखान्याला चांगले गाळप…

Read More

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 8वा दिवस:पेपर लीक सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत मतदान; राज्यसभेतही सादर होणार विधेयक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. मंगळवारी लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘पब्लिक एक्झामिनेशन (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत 9 तास चर्चा झाली. रात्री 11 वाजता लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. आज लोकसभेत विधेयकावर मतदान होईल आणि राज्यसभेत विधेयक मांडून त्यावर चर्चा केली जाईल. या विधेयकात 2024 मध्ये…

Read More

उजनी, वीरच्या विसर्गाचा "संगम''; चंद्रभागा दुथडी‎, उजनीची पातळी नियंत्रणासाठी 61,600 क्यूसेक भीमेत तर वीरमधून नीरा नदीत 5737 क्यूसेकने विसर्ग सुरू‎

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला ६१,६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे. त्यातच वीर धरणातून ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा दुथडी वाहत आहे. पाण्यातील मंदिरे पाण्यात गेली आहेत. यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे चंद्रभागेवरील जुना दगडी पूल दोन…

Read More

घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने केला हल्ला:बागरोजा हडको परिसरातील हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बागरोजा परिसरातील जुन्या साताळकर हॉस्पिटल परिसरात घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्याने मंगळवारी दुपारी हल्ला केला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या आईन . बागरोजा परिसरातील एक तीन वर्षीय मुलगा घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्र्याने पाठीमागून त्याच्यावर झडप घालून हल्ला केला. यात बालकाच्या खांद्याला…

Read More

गुरूपाैर्णिमा उत्सव:शिर्डीत तीन लाखांवर येणार भाविक, आज 24 तास सुरू राहणार साई मंदिर‎

शिर्डीत ११७ व्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून भाविक दाखल होण्यास सुरूवात झाली. ३० जुलैपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविक उत्सवाला उपस्थित राहतील, असा अंदाज श्री साईबाबा संस्थानने व्यक्त केला. गतवर्षीपेक्षा ही संख्या ५० हजारांवर अधिक असणार आहे. यंदा चार लाख भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केले आहे. मुख्य दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी साई मंदिर…

Read More

आयपीएस प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन:युवा शक्तीच राष्ट्रशक्ती- हजारे, जलसंधारण आणि पारदर्शक प्रशासनाचे दिले धडे‎

युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. आजचे युवक-युवती हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. प्रामाणिकपणा, त्याग आणि राष्ट्रसेवेची जिद्द अंगी बाळगून काम केल्यास देश निश्चितच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा प्रेरणादायी संदेश ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध राज्यांतील आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास आणि पाणलोट क्षेत्र विकासाचा अभ्यास…

Read More

संजय दत्त@67: सल्लूने BMW दिली, किल्ली समुद्रात फेकली:इंदिरा गांधी म्हणाल्या- बोर्डिंगमध्ये पाठवा; राजेश खन्ना – ऋषी कपूरला मारण्यास गेला होता संजूबाबा

वर्ष होते 1994. मुंबईतील ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सर्वाधिक कडक सुरक्षा असलेल्या अंडा बॅरेकमध्ये बंद असलेला एक आरोपी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींची वाट पाहत होता. लोखंडी सळ्यांमागे दोन्ही बहिणींनी त्याच्या हातावर राखी बांधली, पण त्या भावाचा खिसा पूर्णपणे रिकामा होता. देण्यासाठी ना कोणती भेट होती, ना पैसे. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याने कारागृहाच्या कॅन्टीनमधून…

Read More

आज वेरूळ येथे लाखो भाविकांसह गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होणार:भारतातील सर्वात मोठी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या मूर्तीची होणार पूजा‎

संतपरंपरेची पवित्र भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात महाराष्ट्रातून लाखो बाबाजी भक्त दाखल होणार आहेत. मिरवणूक आणि पाद्यपूजनाचा मुख्य कार्यक्रम : आश्रमाचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि…

Read More