राज्यात वरुणराजाचे दमदार कमबॅक:विदर्भात ऑरेंज तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट; नागपूर-गडचिरोलीत शाळांना सुट्टी
राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भाला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, मुंबई, कोकण आणि मराठवाड्यासह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य धोका पाहता गडचिरोली तसेच नागपूरमधील शाळा-महाविद्यालयांना आज प्रशासनाकडून…