![]()
राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भाला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, मुंबई, कोकण आणि मराठवाड्यासह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य धोका पाहता गडचिरोली तसेच नागपूरमधील शाळा-महाविद्यालयांना आज प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुठे कोणता अलर्ट? ऑरेंज अलर्ट : विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः गडचिरोलीतील १२ तालुक्यांमध्ये आधीच जोरदार पावसाची नोंद झाली आहे. यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर धोक्याचा इशारा उत्तर आणि मध्य भारतात (अनुपगढ, पिलानी, दाल्तोगंज) सक्रिय झालेल्या वादळी वाऱ्याच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढणार असून, रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी आणि जळगाव येथेही जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मराठवाड्यात सलग तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट असल्याने, गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाधानकारक पावसामुळे बळीराजाला दिलासा यंदाचा जून महिना बहुतांश कोरडा गेला होता, मात्र जुलै महिन्यात राज्यभरात झालेल्या या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जायकवाडीचा जलसाठा ६४ टक्क्यांवर, जिल्ह्याचीसिंचन कपात टळली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडी धरणातील उपयुक्त (जिवंत) जलसाठा ६५ टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास अहिल्यानगर वनाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणीसोडावे लागते. मात्र, घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा ६४.१४ टक्क्यांवर पोहोचला असून, बुधवारी दुपारपर्यंत तो ६५ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदा समन्यायी पाणीवाटपाच्या नियमांतर्गत नगर वनाशिकमधून पाणी सोडण्याची गरज राहणार नसल्याने दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चितता असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, जुलै महिन्यात घाटमाथा आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी व प्रवरा खोऱ्यातीलधरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गसुरू झाला. त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यातझाला असून, १०२ टीएमसी क्षमतेच्या या धरणातील एकूणसाठा ७५.२३ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी मुळाधरणात सध्या १६,३१३ दशलक्षघनफूट म्हणजे ६२.७४ टक्केजलसाठा आहे. भंडारदरा धरण ९२.६३ टक्के, तर निळवंडे धरण९३.३३ टक्के भरले असून, या दोन्हीधरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरूआहे. त्यामुळे जायकवाडीकडे पाण्याची आवक सातत्याने वाढतआहे. जायकवाडीच्या दिशेनेसुरू असलेला विसर्ग
गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर धरणातून २५,९२५ क्युसेक, प्रवरानदीवरील भंडारदरा धरणातून ८३०क्युसेक, निळवंडे धरणातून ७००क्युसेक आणि ओझर बंधाऱ्यातून५,६६१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरण ६५ टक्के उपयुक्त जलसाठ्याचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. देशभरात पाऊस, गुजरातेत कारखान्यांतील काम थांबले:मध्यप्रदेश – छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट; चारधाम यात्रा 2 दिवसांसाठी रोखण्यात आली मान्सून सर्वात सक्रिय टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी देशावर दोन प्रणाली (सिस्टम) सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमधून पुढे सरकत आहे. याचा परिणाम लक्षात घेता, आयएमडीने पुढील 4-5 दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त आणि पुढील 5-6 दिवसांत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात वरुणराजाचे दमदार कमबॅक:विदर्भात ऑरेंज तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट; नागपूर-गडचिरोलीत शाळांना सुट्टी