Headlines

बालगायक, कलाकारांनी गाजवला ‘भक्तीरंग अभंग गायन’ कार्यक्रम:राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समितीचा उपक्रम‎



दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समितीच्यावतीने “भक्तीरंग’ या सदराखाली “वाचे विठ्ठल गाईन’ बाल गायक-कलाकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले. बाल गायकांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून वंदनीय राष्ट्रस

.

अध्यक्षस्थानी गुणवंतराव जानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून हरणे, अविनाश डुडुल, भा. ना. राऊत, प्रा. हरिदास गहुकर, भीमराव गावंडे, गंगाधरराव पाटील, मंगेश कराळे, डॉ. प्रकाश मानकर, समिती अध्यक्ष गोपाल गाडगे, प्रा. डॉ. ममता इंगोले उपस्थित होते. सर्व बाल कलाकारांना प्रोत्साहनपर आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन अॅड. सचिन माहोकार यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मयूर वानखडे यांनी केले. सांगता सामूहिक प्रार्थना व चिंतनाने झाली. राष्ट्रवंदनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. रामेश्वर बरगट, ज्ञानेश्वर साकरकार, शिवा महल्ले, चतारे गुरुजी, गजानन जळमकर, अनंत सरोदे, विक्रम जानोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तन्वी ढोरे व जान्हवी ढोरे या जुळ्या बहिणींनी संत माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे पसायदान गायले.

भक्तीरंग कार्यक्रमात २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात प्रा. गोपाल राऊत यांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या भजनांचे सादरीकरण केले. यात कृष्णल ताले, भक्ती वाऱोकार, शिवांश ताले, आरोही राऊत, पूर्वश्री दिक्कर, हर्षिता शिलवंत, मृणाली उकर्डे, श्रीमयी चिंचोलकर, मोहित वाठुरकर, वेदिका वाठुरकर, गौरी ढोले, नेहल ढोले, शीतल बरडे, शामयदा राठोड, प्राण्या पाटील, माधवी कराळे, आराध्या तिडके, तन्वी खुळे, कार्तिकी गावंडे, आकांक्षा जांभुळकर, राम इंगळे, स्वरा राऊत, मधुरा गावंडे सहभागी होते. याप्रसंगी प्रौढ गायक चतारे गुरुजी, मुक्ता पाटील, गोपाल राऊत, तबलावादक अनिरुद्ध दळवी, गणेश चोंडेकर, प्रल्हाद निखाडे, सागर पारेकर, डॉ. धर्मपाल चिंचोलकर यांनी गायनसेवा सादर केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *