राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अर्थहीन- शरद पवार:बारामतीत वक्तव्य, राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, असे सांगत त्यांनी या शक्यता थेट उडवून लावल्या. जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झालेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही…