Headlines

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा:पहिल्या टप्प्यात 13,600 कोटींची कर्जमाफी, दुसरी यादी ऑगस्टमध्ये; नाव नसल्यास तक्रारीचे आवाहन




राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. १६.९६ लाख शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, २५ जुलै रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. आधार पडताळणी पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. दोन लाखांपर्यंतच्या थकीत कर्जांना प्राधान्य कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या तसेच उर्वरित पात्र खात्यांचा समावेश पुढील याद्यांमध्ये केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. एनपीए खात्यांनाही दिलासा व्यापारी बँकांकडील अनुत्पादित (एनपीए) कर्ज खात्यांसाठीही विशेष तडजोडीची सवलत देण्यात आली आहे. कर्ज थकीत राहिलेल्या कालावधीनुसार ३५ ते ८५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिलनंतर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक लाभार्थी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्यांची संख्या १ लाख ३२ हजार ७३४ इतकी आहे. त्यानंतर बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी ३ हजार ७०८ लाभार्थी आहेत. नाव नसल्यास तक्रार करण्याचे आवाहन कर्जमाफीसाठी पात्र असूनही नाव यादीत नसलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय समिती किंवा संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासनाकडून सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मंजूर रक्कम कमी दिसताच बँकांमध्ये चौकशीसाठी गर्दी, दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जालना जिल्ह्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण कर्जापेक्षा कमी रक्कम मंजूर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेमकी कर्जमाफी कशी होणार, उर्वरित रकमेचे काय होणार, पुढील प्रक्रिया काय असेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध शंका निर्माण झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांच्या नावावर सुमारे एक लाख ९० हजार रुपयांचे पीककर्ज असताना कर्जमाफीच्या यादीत केवळ ७० हजार रुपये मंजूर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम पुढील टप्प्यात मंजूर होणार का, हीच अंतिम रक्कम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन न मिळाल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. यासोबतच कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी ई-केवायसी करणे आवश्यक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ई-केवायसी केल्यानंतर कमी रक्कमच अंतिम मानली जाईल, असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ई-केवायसी करण्याबाबतही साशंक आहेत. या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, अनेक बँक कर्मचाऱ्यांनाही शासनाकडून अद्याप सविस्तर सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने ते शेतकऱ्यांना ठोस माहिती देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. शासनाने तातडीने अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी होत आहे. याबाबत एसबीआय वडीगोद्री शाखेचे व्यवस्थापक रोहित काळगे म्हणाले, “शेतकरी मोठ्या संख्येने बँकेत येऊन चौकशी करत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कर्जापेक्षा कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने मंजूर रक्कमेचे निकष, उर्वरित कर्जाची प्रक्रिया, ई-केवायसीबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती तातडीने जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. हेही वाचा.. कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच: काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *