![]()
तरुणांनी छेडलेल्या आंदोलनाचा राजकीय फायदा कसा उठवता येईल, या हेतूने काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि गुंड आंदोलनात घुसून हुल्लडबाजी करत असल्याचे देशाने पाहिले आहे. या प्रकरणी झालेल्या अटकेत ज्यांचा शाळा-कॉलेजांशी दूरवरचाही संबंध नाही, अशा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अशा असामाजिक घटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांमध्ये जे खरे विद्यार्थी आहेत, त्यांच्याबाबत गृहखाते सकारात्मक विचार करेल. परंतु, केवळ दगडफेक करणे, दंगा-मस्ती करणे, पोलिसांना त्रास देणे आणि वाहनांची तोडफोड करण्याच्या उद्देशाने जे आंदोलनात घुसले होते, त्यांना सोडण्याची गरज नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नावाचा उल्लेख न करता खडसेंना टोला गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार राजकीय टोलेबाजी केली. आपणही कुठेतरी थांबले पाहिजे. स्मशानात जाईपर्यंत मीच; उठायला जमत नाही, बसायला जमत नाही, तरीही कुठेही मीच… अशा प्रकारची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरणार नाही. त्यामुळे योग्य वेळी थांबणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी खडसेंवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. महाजनांकडून निवृत्तीचे संकेत गिरीश महाजन म्हणाले की, मंगेश चव्हाण यांना पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी देताना मी माझी प्रतिष्ठा पणाला लावली होती. ते चार हजार मतांनी निवडून आल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी सर्वांनाच मागे टाकले. माझ्या सलग 7 टर्म निवडून येण्याचा विक्रम मंगेश दादा नक्कीच मोडतील आणि भाजपमधील उद्याचे मोठे नेते म्हणून पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्वतःच्या वयाचा उल्लेख टाळत “माझे वय इथे सांगितले तर मंत्री गुलाबराव पाटील लगेच टीका-टिपणी करतील, पण आम्ही आता आणखी किती दिवसात एखादी टर्म होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे.
Source link
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न:दगडफेक अन् वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी- गिरीश महाजन