पुणे पोलिसांची भाडेकरू पडताळणी मोहीम सुरू:माहिती न दिल्यास घरमालकांवर होणार कायदेशीर कारवाई
शहरातील वाढती लोकसंख्या, परराज्य व इतर जिल्ह्यांतून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी होणारे स्थलांतर लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी भाडेकरू व घरमालकांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर परराज्य व…