Headlines

मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलं:तरीही काही शंका असतील तर मार्ग काढू; जरांगेंच्या इशाऱ्यावर फडणवीसांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे मोठे आदेश त्यांनी गृह विभागाला दिले आहेत. तसेच, काँग्रेस नेते…

Read More

Maharashtra ST Bus NCMC Smart Card Deadline Extended

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ न . राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात…

Read More

IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या:दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू

देशातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) बॉम्बेमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2026 रोजी रात्री पवई येथील आयआयटी परिसरातील हॉस्टेल क्रमांक 4 मधील खोली क्रमांक ‘जी-4147’ मध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून…

Read More

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय घुसखोरीचा आरोप:उदय सामंतांचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाले- मनोज जरांगे पाटलांच्या शंकांचे निरसन करू

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यांचा वापर करू नये, असे सामंत म्हणाले. यासोबतच, मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा, कंगना रनौत यांचे…

Read More

सेवा क्षेत्र सर्वेक्षण, पुण्यात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न:देशाच्या जीडीपी-धोरणनिर्मितीसाठी सेवा क्षेत्राची अचूक माहिती आवश्यक- डॉ. रुही कुलकर्णी

भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) वार्षिक समाविष्ट सेवा क्षेत्र उद्योग सर्वेक्षण-2026 संदर्भात पुण्यात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. सेंटर फॉर पोलिस रिसर्च ऑडिटोरियम येथे झालेल्या या कार्यशाळेत सेवा क्षेत्रातील उद्योगांना सर्वेक्षणाची माहिती, ऑनलाइन माहिती सादर करण्याची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी एनएसओ, प्रादेशिक…

Read More

चांदी ₹1270 ने महाग होऊन ₹2.19 लाखांवर पोहोचली:10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹178 ने वाढून ₹1.42 लाख, कॅरेटनुसार किंमत पाहा

आज म्हणजेच २९ जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी १,२७० रुपयांनी महाग होऊन २.१९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १७८ रुपयांनी वाढून १.४२ लाख रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी सोन्यात आतापर्यंत तेजी राहिली या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने…

Read More

6 महिन्यांतच गाड्यांचा कंटाळा?:मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आता हवी 'इनोव्हा', पालिकेची लूटमार योग्य नाही- पेडणेकर

मुंबई महापालिकेत अवघ्या सहा महिन्यांतच पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नवीन आणि अधिक महागड्या गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. जानेवारी महिन्यात पालिकेने पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी ‘स्कॉर्पिओ’ गाड्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्या सोयीच्या नसल्याचे कारण देत आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाड्या घेण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून तयार…

Read More

मनोज जरांगेंचा अंतरवालीतून एल्गार:29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा, म्हणाले- 58 लाख प्रमाणपत्रे घेतल्याशिवाय हटणार नाही

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला असून, ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन पुकारण्याची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. ५८…

Read More

विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा:दिव्य मराठी ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’मध्ये नाशिकच्या विकासावर मंथन, दिव्य मराठीतर्फे 31 जुलैला मुंबईत आयोजन

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नाशिकचा ब्रँड अधिक भक्कम करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने शुक्रवारी (दि. 31) मुंबईत ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा…

Read More

सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या आमिषाने 26 लाखांची फसवणूक:एकाविरुद्ध मांजरी पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

सातबारा उताऱ्यावरून कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी प्रसाद उद्धव शिरसाठ (वय 50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नाव त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावरून कमी झाले…

Read More