पिंपरी-चिंचवडसाठी HCMTR, E-RTS प्रकल्पाला गती:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तातडीने अंमलबजावणीचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रायोगिक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. पुणे आणि…