कुमकुमची आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण झेप:वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने वाजवला डंका
चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजेत्या महिला संघात येथील मणीबाई गुजराती हायस्कुलच्या कुमकुम अनिल मोहोडचाही समावेश आहे. कुमकुमच्या या उल्लेखनीय यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि जुनियर…