![]()
मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढू असे सरकारने सांगितले होते पण तसे काही केले नाही, आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज त्या विषयावर 11 वाजता सर्वांशी चर्चा करू आणि ठरवू. पण आंदोलन केल्याशिवाय सरकार काही वटणीवर येत नाही. सरकारकडून गोड बोलून फसवण्याचे काम अनेक वेळा झाले आहे. पण राज्यात मराठ्यांची मोठी ताकद आहे.ती सरकारने बघितली आहे. सरकारने पुन्हा पुन्हा आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नये. पण आता आंतरवाली सराटीमध्ये खूप मोठे आंदोलन होणार आहे. कसलाही विचार करणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला लढावे लागते त्याशिवाय आमच्या लेकराबाळांचे कल्याण होणार नाही. समाजाच्या कल्याणासाठी आम्ही उन्ह, पाऊस कसलाही विचार करणार नाहीत. जीआर काढला, अंमलबजावणी केली पण ते प्रमाणपत्र द्यायचे कधी आता ॲडमिशन सुरू झाले आहेत. सातारा गॅझेटचा जीआर कधी काढणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. आंदोलनाचे स्वरुप सांगितले नाही म्हणूनच मी टिकलो आहे. दिल्लीला आरक्षणासाठी जायचे नाही, ते दिल्ली पाहण्यासाठी जायचे आहे. जी तारीख आज घोषित करण्यात येईल त्याच दिवशी आंदोलन करण्यात येईल. ..आमची ताकद तुम्ही पाहिली मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने मतदान केल्यानेच तुम्हाला एसीमध्ये खुर्चीवर बसता आले आहे. गरीबांना तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही एक दोन वेळा आमची ताकद पाहिली आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Source link
आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर आदेश देणार का?:आंदोलन केल्याशिवाय सरकार वटणीवर येत नाही, मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा एल्गार