Headlines

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार?:ऑपरेशन टायगर 3.0 सुरु, 14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील- गुलाबराव पाटलांचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची चर्चा रंगली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात आल्यानंतर आता १४ पेक्षा जास्त आमदारही आमच्यासोबत येतील, असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाले आहे. थोडं थांबा, १४ पेक्षा जास्त…

Read More

"गुड बाय माय लव्ह…":ती आपल्या मनात कायम जिवंत राहील- जनाई भोसले; आशाताईंच्या नातीची हृदयस्पर्शी पोस्ट

आपल्या सुमधुर आवाजाने शतकानुशतके रसिकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता चटका लावून जाणारी असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंना निरोप देताना त्यांची नात जनाई भोसले प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले….

Read More

मोहोळ तालुक्यात खरिपाचा पेरा वाढणार:20 हजार मेट्रिक टन खत पुरवठ्याचे केले नियोजन, मशागतीची कामे युद्धपातळीवर; कृषी विभागाला 30500 हेक्टरवर पेरणीची आशा

निसर्गाचा लहरीपणा आणि सूर्याचा आग ओकणारा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना करत मोहोळ तालुक्यातील बळीराजा आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, गेल्या वर्षी . तालुक्यात सध्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात दुपारी शुकशुकाट…

Read More

कुंभ व्हायरल गर्ल लग्नानंतर एका महिन्यातच गर्भवती:पती म्हणाला- डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्यास सांगितले, पोलिसांसमोर हजर होणार नाही

प्रयागराज महाकुंभातून चर्चेत आलेली व्हायरल गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिचा पती फरमान खानने दावा केला आहे की, पत्नी गर्भवती आहे. अशा परिस्थितीत ती प्रवास करू शकत नाही, ना पोलिसांसमोर हजर होऊ शकते. कोचीला पोहोचलेल्या मध्य प्रदेश पोलिसांना फरमानने सांगितले की, डॉक्टरांनी पत्नीचे आरोग्य आणि गर्भधारणा लक्षात घेऊन तिला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. सध्या,…

Read More

ज्येष्ठांसाठी 'आएस्का' मोबाईल ॲपचे लोकार्पण:हे ॲप मदतनीस ठरेल, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांचा विश्वास

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ‘ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन’ (एआयएससीए) या संस्थेने विकसित केलेल्या ‘आएस्का’ मोबाईल ॲपचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांनी या ॲपचे महत्त्व अधोरेखित करत, हे ज्येष्ठांसाठी एक महत्त्वाचा मदतनीस ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात हे ॲप लाँच करण्यात आले. वृद्धत्व…

Read More

मध्यरात्रीच्या 2 अपघातांत 14 ठार:एका घटनेत वळणाचा अंदाज चुकल्याने तर दुसऱ्यात चालकाचा राँगसाइड टर्नने मृत्यू ओढवला

शनिवार, रविवारी मध्यरात्री दोन अपघातांत ८ तरुणांसह १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील अपघात चालकाचा घाट वळणाचा अंदाज चुकल्याने घडला असावा, तर दुसरा धुळ्याच्या लळिंग घाटात चालकाने राँगसाइड टर्न घेतल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसले. आंबेनळी घाटात ८०० फूटखोल दरीत कार कोसळली महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रायगड जिल्ह्यातील धोकादायक आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे शनिवारी रात्री बारा वाजेच्या…

Read More

नोव्हेंबरपासून सिंहस्थ गुरु दोषामुळे शुभ कार्याला ब्रेक:23 जानेवारी 2017 पर्यंत विवाह नाहीत‎

३१ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने शहरात ‘सिंहस्थ गुरु दोष’ लागणार आहे. या दोषामुळे नोव्हेंबर २०२६ पासून २३ जानेवारी २०२७ पर्यंत विवाह, वास्तूपूजन, भूमीपूजन, नवीन कामांचा शुभारंभ, मुंडन, यज्ञोपवीत व व्रत उद्यापन यासारखी सर्व शुभ कार्ये वर्ज्य राहणार असल्याचे अकोला पुरोहित संघाचे म्हणणे आहे. श्री बालाजी मंदिरात पुरोहित संघाची सभा आयोजित…

Read More

मंत्री उदय सामंतांच्या पत्नीसाठी अख्खी यंत्रणा कामाला:नेते आता कलाकारांचे क्षेत्रही बळकावणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, यावेळची लढत केवळ कलाकारांपुरती मर्यादित न राहता त्यात आता राजकीय ‘हायव्होल्टेज’ ड्रामा सुरू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या पत्नी नीलम सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री…

Read More

पालघरमध्ये पुराचे विदारक चित्र:छतावर मृतदेह ठेवून कुटुंबीयांनी काढले पुरात 4 तास, काळीज हेलावून टाकणारी घटना

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे मन हेलावून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. घराभोवती पुराचे पाणी साचल्याने आणि घरात पाणी शिरल्याने एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे तर दूरच, पण तो सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबीयांना लहान मुलांसह तब्बल चार तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा…

Read More

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More