Headlines

राज्यातील 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या:डॉ. माधवी खोडे-चवरे मंत्रालयात सचिवपदी, तर आदित्य जिवने जळगावचे नवे मनपा आयुक्त

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी प्रशासकीय पातळीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, याअंतर्गत नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून…

Read More

अल्पवयीन मुलीची दाेन लाखांत विक्री:मुली विकणारी टाेळी नाशकात अटकेत, नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील घटना

आईचे छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नविन कपडे घेऊन देण्याचे अमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हरसूलनजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तिचा बाल विवाह करून देण्यात आला. तेथील वरासाठी मुलगी शोधून देण्याकरिता 2 लाखांची दलाली घेतलेला संशयित आणि पतीसह 10 संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली. तुषार पाचपिंड…

Read More

‘एक गाव, एक वडाचे झाड’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद:छावा प्रतिष्ठानच्या वतीने‎महिलांचा विशेष सन्मान‎

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी छावा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘एक गाव, एक वडाचे झाड’ या अभिनव उपक्रमाला शेळगाव (आर) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी गावातील सदस्यांना वडाची रोपे वाटप करण्यात आली होती. केवळ वृक्षारोपण न करता त्या रोपांचे संगोपन करण्यावर भर देण्यात आला होता. याला सकारात्मक प्रतिसाद…

Read More

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे 11,000 वृक्षरोपांची लागवड:नाशिकच्या विविध तालुक्यांसह राज्यभरातील आश्रमांत वृक्षारोपण‎

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राज्यभरातील तसेच राज्याबाहेरील विविध आश्रमांमध्ये ११,००० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्पही केला. सततच्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर “निसर्गाचे आपण देणे लागतो’ या भावनेतून पर्यावरण संरक्षणासाठी जय बाबाजी भक्त परिवारातर्फे दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते….

Read More

समय रैनावर मुकेश खन्ना संतापले:म्हणाले- शक्तिमानचा अपमान केला, तुला तोंड काळे करून गाढवावर फिरवायला पाहिजे

अभिनेता मुकेश खन्ना कॉमेडियन समय रैनावर संतापले आणि बुधवारी त्यांनी एक संपादित (एडिटेड) फोटो शेअर केला, ज्यात समय रैनाला गाढवावर बसलेले दाखवले होते. त्यावर लिहिले होते की, समय रैना तू फक्त गाढवावर बसण्याच्या लायकीचा आहेस!! तेही तोंड काळं करून. त्या फोटोसोबत मुकेश खन्ना यांनी इंस्टाग्रामवर हे लिहिले, ‘कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहते. त्याला लाख बाटल्यांमध्ये ठेवा….

Read More

देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी सीमा बांधवांचा उल्लेख केला का?:बेळगाव प्रश्नावरून संजय राऊतांचा सवाल, हुतात्मा स्मारकाला तडे गेलेत, सत्ताधाऱ्यांनी तिथे लक्ष द्यावं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तरी सीमा बांधवांचास एकदा तरी उल्लेख केला आहे का? किंवा भाजपच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षांमध्ये बेळगाव शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा उल्लेख तरी केला आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात भाजपचे लोकं…

Read More

महाराष्ट्रात वाढणार उष्णतेची तीव्रता आणि अतिवृष्टी:30 वर्षांत 2 अंशांपर्यंत तापमान वाढीचा ‘सीएसटीइपी’चा इशारा

‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सीएसटीइपी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसीच्या आकडेवारीचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 2021 ते 2050 या काळात महाराष्ट्रातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. तसेच, पावसाचे दिवस आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. वाढत्या वायू…

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त

देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…

Read More

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क:प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण, जनजागृतीवर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने…

Read More

विरोधकांच्या ताकदीपुढे मोदी सरकार अक्षरशः थंड पडले:भाजपची उलटगणती सुरू, MIM चा मोदींच्या संबोधनाचा दाखला देत दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन पाहता विरोधकांच्या ताकदीपुढे केंद्र सरकार अक्षरशः थंड पडल्याचे स्पष्ट होते, अशी टीका एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केंद्रावर निशाणा साधताना केली आहे. सत्ताधारी भाजपची सत्तेतून उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. पंतप्रधानांचे हे संबोधन, जे साधारणपणे अर्धा…

Read More