रस्त्यावर तडफडणाऱ्या जखमी महिलेवर उपचार:सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांची सतर्कता; सर्किट हाऊस जवळील घटना
मध्यवर्ती बसस्थानक व सर्किट हाऊस परिसरात रस्त्याच्या कडेला एका अनोळखी महिला गंभीर व वेदनादायक अवस्थेत दिसून आली. तिच्या पायाला मोठी जखम झाली होती आणि ती प्रचंड सुजली होती. जखमेवर माशा बसत होत्या. ही स्थिती पाहून रस्त्याने जाणारे संभाजी ब्रिगेडचे शहर सचिव ऋषभ काळे व शहराध्यक्ष देवा गावंडे यांनी मदतीचा हात पुढे केला. सुरुवातीला ऋषभ काळे…