झुडुपांनी व्यापलेल्या वाघदर्डी-भडाणे रस्त्यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण:शिवरस्ता खुला करण्यासाठी विद्यार्थी थेट तहसीलदारांच्या दालनात
चांदवड वाघदर्डी-भडाणे शिवरस्ता काटेरी झुडुपांनी व्यापल्याने आणि रस्त्यावर गाळ साचल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वन्यप्राणी व विषारी सर्पांची भीती असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शाळा बुडवून थेट चांदवड तहसीलदारांकडे धाव घेत रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. वाघदर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत वाघदर्डी व भडाणे परिसरातील विद्यार्थी या शिवरस्त्याने ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दोन्ही…