![]()
पिंपळगाव पेठ महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती व बालविवाह प्रतिबंध अभियान पंधरवड्यांतर्गत आसडी येथील गजानन विद्यालयात विशेष जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोककला, शाहिरी आणि प्रबोधनपर सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश देण्यात आला. नागेश्वर प्रासादिक नाट्यमंडळ (रहिमाबाद) आणि आत्मानंद लोककला मंच (आव्हाना) यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापक अनिल गावंडे व डी. डी. जाधव यांच्या हस्ते निमंत्रित कलाकार शाहीर रत्नाकर जैन आणि शाहीर बिहारीलाल राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एम. व्ही. पाटील यांनी केले. त्यांनी शासनाच्या नशामुक्ती व बालविवाह प्रतिबंध अभियानाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. आजच्या तरुण पिढीत आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यानंतर दोन्ही कलापथकांनी लोककला, शाहिरी, गीते, संवाद आणि नाट्यरूप सादरीकरणातून व्यसनांचे मानवी जीवनावरील दुष्परिणाम अतिशय प्रभावीपणे मांडले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी काकडे, देशमुख, बनकर, भागवत मिरगे, फुले, शंकर शेळके यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन विद्यालयात बालविवाह प्रतिबंध अभियान राबवण्यात आले.
Source link
कलापथकाद्वारे जनजागृती:गजानन विद्यालयामध्ये नशामुक्तीसहबालविवाह प्रतिबंध अभियान उत्साहात, आसडी येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद