Headlines

गोरेगाव आरे मेट्रो स्टेशनजवळ बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अचानक आगीचा भडका, परिसरात खळबळ; VIDEO




मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव आरे मेट्रो स्थानकाखाली आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग बेस्टच्या एका बसला लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठे लोट आणि आगीचे भयंकर लोळ पाहायला मिळाले. मुख्य महामार्गावरच हा प्रकार घडल्याने नागरिकांचे लक्ष या आगीकडे वेधले गेले. मेट्रो मार्गिका 7 वरील ओबेरॉय गार्डन सिटी स्टेशनखाली एका बसला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीतून निघणारा दाट धूर थेट वरच्या मेट्रो स्टेशन परिसरात पसरल्याने प्रवाशांना श्वास घेणे कठीण झाले होते. धुराचे प्रमाण प्रचंड असल्याने जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी स्टेशनबाहेर धाव घेतली, ज्यामुळे मेट्रो स्थानकावर काही काळ मोठा गोंधळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गावर ऐन वर्दळीच्या ठिकाणी बसला आग लागल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव इतर वाहने थांबवण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, सध्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *