घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणाच नाही:मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे नियोजनाचा अभाव, पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत करा- ॲड. प्रकाश आंबेडकर
पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. “घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा…