Headlines

अबू आझमींचा सरकारवर हल्लाबोल:'सरकार धंदा करायला बसलेली नाही; जनतेला सवलत देणं हेच सरकारचं काम'

राज्य सरकारचे काम नफा-तोटा पाहणे नसून जनतेला सवलती देणे आणि रोजगार निर्माण करणे हे आहे. सरकार धंदा करायला बसलेली नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पॉवरलूम उद्योग, वीजदर, समान नागरी संहिता (UCC), कथित भ्रष्टाचार, पक्षांतर आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले….

Read More

मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान…

Read More

हिंगोलीत पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त:15.10 लाखांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांवर गुन्हा दाखल

हिंगोली शहरात पोलिसांची नजर चुकवून भल्या पहाटे वाळू वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ता. १० पहाटे साडेपाच वाजता पकडले आहे. यामध्ये टिप्परसह १५.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली आहे. शहरी व ग्रामीण भागातून…

Read More

मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे:रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, कर्जमाफीपासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या कामकाजावर टीका करणे हा लोकशाहीतील विरोधकांचा अधिकार असून, त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, निकृष्ट दर्जाची विकासकामे, अजित पवारांच्या अपघाताची…

Read More

मंदिर विधेयकावरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल:अयोध्येच्या तिजोरीत चोरी, मग रामटेक देवस्थानात राजकारणी कशाला?

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा असताना, रामटेकसारख्या ऐतिहासिक मंदिराच्या व्यवस्थापनात घाईघाईने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “या मंदिराच्या विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्तींची…

Read More

आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही:निधीची अडवणूक सुरू, 5-6 जणांशी संपर्क साधणारे एजंट उघडे पाडू- केशव पोरजे

नाशिक महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती…

Read More

देशभरात रोज 13 शाळा बंद:अर्ध्याहून अधिक 2,426 शाळा मध्य प्रदेशातील, उच्च शिक्षणामध्ये मुलींची संख्या 42.2% नी वाढली

भारतातील शालेय शिक्षणावरील एकात्मिक जिल्हा शिक्षण माहिती प्रणाली (UDISE+) आणि AISHE चा अहवाल शिक्षणाशी संबंधित दोन भिन्न पैलूंवर प्रकाश टाकतो. UDISE च्या अहवालानुसार, देशात दररोज 13 शाळा बंद झाल्या. शाळा बंद झालेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश सर्वात पुढे आहे. AISHE च्या अहवालात म्हटले आहे की, उच्च शिक्षणामध्ये मुलींची संख्या वाढली आहे. अहवालात म्हटले आहे की, 2025-26…

Read More

कारमध्ये राघवने सर्वांसमोर शहनाजला मांडीवर बसवले:ढकला-ढकलीदरम्यान हात घट्ट धरून ठेवला; नात्याची पुष्टी केली

अभिनेता राघव जुयालच्या गुरुवारी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेत्री शहनाज गिल त्याच्यासोबत दिसली. दोघांना कार्यक्रमातून एकत्र बाहेर पडताना आणि एकाच गाडीत जाताना पाहिले गेले, ज्यात शहनाज राघवच्या मांडीवर बसलेली दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले. दोघांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दोघांनी या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर,…

Read More

आमदार संजय गायकवाड शिवीगाळ प्रकरण:पोलिसांच्या भूमिकेवर प्रशांत आंबींची तीव्र नाराजी, म्हणाले- 'सत्ताधारी आणि गरिबांसाठी न्याय वेगळा आहे का?'

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित धमकीप्रकरणी कारवाईला गती मिळत नसल्याने प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने सदर खटला मागे घेण्याच्या सूचना दिल्याने, आता या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे. दरम्यान, जिल्हा सत्र…

Read More

संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कळस:सपासप वार करून अल्पवयीन आरोपीचा 'भाई' स्टाईलने पळ, हत्येचा थरारक VIDEO समोर

घराच्या ओट्यावर बसून तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देणे एका ५० वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. मुकुंदवाडी परिसरात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने सपासप वार करून रोहिदास दत्तू खकाळ (वय ५०) यांची अत्यंत निर्घृण हत्या केली. बुधवारी (८ जुलै) मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, आता या हत्याकांडाचा अंगावर काटा…

Read More