एटीएसची मोठी कारवाई, 175 संशयितांची चौकशी:पाकिस्तान-दुबई कनेक्शन; पूर्व विदर्भातील 10 जणांचा समावेश
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. राज्यभरातील तब्बल १७५ संशयित तरुण भट्टीच्या संपर्कात आल्याचे उघड झाल्यानंतर, एटीएसने आज सकाळी ७ वाजल्यापासून एकाच वेळी धडक शोध मोहीम सुरू केली. या कारवाईमुळे देशविरोधी शक्तींचे मोठे डिजिटल जाळे उघडकीस…