नीट पेपरफुटीविरोधात मनसेचे आंदोलन:संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसवर धडक, क्लास पाडला बंद; फी परत देण्याची मागणी
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. पेपरफुटीच्या चौकशीत नाव समोर आलेले ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील आरसीसी क्लासेसवर धडक देऊन कामकाज बंद पाडले. पेपरफुटीच्या मानसिक तणावातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याप्रकरणी…