Headlines

अभिनेता राम चरण म्हणाला- मी कठोर वडील:मुलांना धोका पत्करणे आणि मातीत खेळायला शिकवतो, पत्नी उपासना घरात काळजी घेणारी भूमिका बजावते

साऊथ अभिनेता राम चरण सध्या त्यांच्या व्यावसायिक जीवनासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या पालकत्वाच्या शैलीबद्दल म्हणजेच मुलांना वाढवण्याच्या पद्धतीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. तीन मुलांचे वडील राम चरण यांनी स्वतःला एक ‘रफ’ (एका अर्थाने कठोर) वडील म्हटले आहे. त्यांचे मत आहे की मुलांना लहानपणापासूनच आव्हानांना सामोरे जाणे आणि जोखीम पत्करणे शिकले पाहिजे. अभिनेता मुलांना जोखीम…

Read More

आम्ही घाबरणार नाही:भावावर कुऱ्हाडीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर पंकज त्रिपाठी म्हणाले, 'जगात कोणासोबतही चुकीचं केलं नाही'

जूनमध्ये पंकज त्रिपाठी यांचे मोठे बंधू विजेंद्र नाथ यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर ते गंभीर जखमी झाले होते. आता बऱ्याच काळानंतर पंकज त्रिपाठी यांनी या हल्ल्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कुटुंबाने कधीही कोणासोबत चुकीचे केले नाही, म्हणूनच त्यांचे कुटुंब कोणालाही घाबरत नाही. नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत…

Read More

लासूर स्टेशन परिसरात पिके उगवली; शेतकरी कोळपणीच्या कामात व्यग्र

लासूरगाव, लासूर स्टेशन, सावंगी, देवळी, माळीवाडगाव, डोणगाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या कोळपणी व तण नियंत्रणाच्या कामांना वेग दिल्याने शेतीशिवारामध्ये हे चित्र दिसून येत आहे. मागील आठवडाभर झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे शेतांमध्ये कापूस, मका, तूर, मूग व भुईमूग या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. मात्र गुरुवारपासून सोमवारपर्यंत पावसाने…

Read More

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माती परीक्षण:महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरुड येथील रसायनशास्त्र विभागाद्वारे दरवर्षी वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात. रसायनशास्त्र व विज्ञान समाजासाठी किती उपयुक्त आहे, या विषयावर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यावर्षी विभागातील पदव्युत्तर रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीमध्ये जाऊन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा केले. त्यांची प्रयोगशाळेत सविस्तर चाचणी करून अभ्यास…

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More

पुणे रेव्ह पार्टीवरून शरद पवार गट आक्रमक:शिवराज्याभिषेक दिनी पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? रोहिणी खडसेंचा सवाल

पुण्यातील ऐतिहासिक व पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळापूर परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट राज्य सरकारला घेरले आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाच्या पवित्र भूमीत आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी अशा मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीला परवानगी दिलीच कशी?” असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन…

Read More

राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये ‘कृषी इनोव्हेटर्स’ संघ विजेता:चांदवडच्या जैन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘ब्लॉकव्हर्स 2026’ हॅकेथॉन उत्साहात‎

येथील एसएनजेबी संकुलातील स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ब्लॉकव्हर्स २०२६ या १२ तासांच्या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. गुगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस, स्पेस व आर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेत कृषी इनोव्हेटर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावत १५ हजारांचे पारितोषिक मिळविले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत…

Read More

जड रोलर अंगावरून गेल्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू:बार्शीत क्रिकेट समर कॅम्पमधील दुर्दैवी घटना; कोचवर निष्काळजीपणाचा आरोप

बार्शीतील शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास क्रिकेटची खेळपट्टी (पिच) तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर अंगावर गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय 15) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी…

Read More

हिंगोलीच्या सिरेहकशाह बाबा तलावाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार:14 कोटींच्या निधीतून संरक्षण भिंतीसह सांडव्याचे बांधकाम, सीईओंनी केली पाहणी

हिंगोली शहरातील जलेश्‍वर तलावाच्या सुशोभीकरणानंतर आता सिरेहकशाह बाबा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार असून सध्याच्या स्थितीत 14 कोटी रुपये खर्चुन सांडव्याच्या कामासह संरक्षण भिंतीचे काम केले जात आहे. या शिवाय तलावातील गाळ काढण्याचे कामही हाती घेण्यात आले असून यामुळे तलावात तब्बल 932 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असून तलावाच्या सुशोभीकरणामुळे…

Read More

पैठणमध्ये सर्व कार्यालये येणार एकाच छताखाली; वेळ, पैशांची होणार बचत:प्रशासकीय इमारत अंतिम टप्प्यात, लवकरच लोकार्पण‎

तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी उभारण्यात येत असलेल्या पैठण शहरातील नव्या प्रशासकीय इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकाच छताखाली सर्व कार्यालये ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून लवकरच तालुकावासीयांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रशासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले….

Read More