Headlines

10, 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा पुढील वर्षी येऊ शकतात:पॉलिमर शीट कंपन्या निविदा स्पर्धेत, 18 ऑगस्टला टेंडर

देशात पुढील वर्षापासून प्लास्टिकच्या नोटा चलनात येऊ शकतात. याची सुरुवात १० आणि २० रुपयांच्या छोट्या नोटांपासून होईल. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रणालयाच्या बेंगळुरू युनिटने ओपेसिफाइड पॉलिमर सबस्ट्रेट शीट्सच्या पुरवठ्यासाठी जगभरातील कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. हे टेंडर १८ ऑगस्ट रोजी उघडेल. देशात प्लास्टिक नोटांची शीट तयार करणाऱ्या कंपन्या नाहीत. नुकतेच आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले…

Read More

मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती

अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीला नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनील मेश्राम, नितीन ताकवाले, रणजीत खेडकर उपस्थित होते….

Read More

पुण्याच्या अनिका दुबेची कॅनडामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड:जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

पुण्यातील १६ वर्षीय स्क्वॉशपटू अनिका दुबे हिची कॅनडामध्ये होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २० ते ३१ जुलैदरम्यान नायगरा-ऑन-द-लेक येथे होणाऱ्या या स्पर्धेत अनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या ३३व्या आशियाई ज्युनियर वैयक्तिक स्पर्धेत तिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले होते. अनिका ही तीन वेळा राष्ट्रीय…

Read More

बी.टी. देशमुख यांनी अमरावतीचा पाणीप्रश्न सोडवला:श्रद्धांजली सभेत न्या. भूषण गवई यांनी केले स्मरण

अमरावती आणि बडनेरावासियांना ६० किलोमीटर अंतरावरील सिंभोरा (ता. मोर्शी) येथील अप्पर वर्धा धरणातून पाणी उपलब्ध करून देणारे माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांचे कार्य अविस्मरणीय आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या श्रद्धांजली सभेत हे प्रतिपादन केले. अमरावतीकर त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे गवई म्हणाले. विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. बी.टी….

Read More

पुण्यात अग्रेको इंडियाची ४०० कोटींची गुंतवणूक:राज्य सरकारसोबत करार, पुढील १० वर्षांत होणार एक हजार रोजगार निर्मिती

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या…

Read More

भगवंताची भक्ती करण्यासाठी वयाचे बंधन नसते- सुदर्शन शर्मा

संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. भगवंताच्या निस्सीम भक्तीमुळे मानवाच्या जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वयाची आवश्यकता नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ध्रुवाचे चरित्र होय, असे प्रतिपादन भागवताचार्य तथा ज्योतिषाचार्य पंडित सुदर्शन शर्मा यांनी केले. ते गोरक्षण रोड परिसरातील…

Read More

हेलिकॉप्टर अपघातात गायक ऑलिव्हर ट्रीचा मृत्यू:ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर धडकले, यूट्यूबर गॅस्पीचाही जीव गेला; एकूण सहा लोकांचा बळी गेला

गायक-गीतकार ऑलिव्हर ट्री यांचा ब्राझीलमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ते 32 वर्षांचे होते. या अपघातात एकूण सहा लोकांचा बळी गेला. मृतकांमध्ये ऑलिव्हर ट्री, अर्जेंटिनाच्या यूट्यूबर गॅस्पर प्रिम (गॅस्पी), लुकास विग्नेल, लुकास ब्रिटो चावेस आणि पायलट अलेक्झांड्रे सूझा व चार्ल्स मार्सिलॅक यांचा समावेश होता. अपघाताच्या वेळी ऑलिव्हर ट्री आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर होते. त्यांनी 6 जून रोजी साओ…

Read More

अर्जुन रामपालचे 14 चित्रपट फ्लॉप झाले, भाडे देऊ शकला नाही:मॉडेलपासून अभिनेता बनला; नकारात्मक भूमिकांमुळे स्टारडम मिळाले, 'धुरंधर'ने नशीब बदलले

एक काळ असा होता जेव्हा अर्जुन रामपाल, जो बॉलिवूडमध्ये त्याच्या शैली आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखला जात होता, त्याचे करिअर चढ-उतारांनी भरलेले होते. मॉडेलिंगमधून चित्रपटांमध्ये आलेल्या अर्जुनने सुरुवातीला आपली ओळख निर्माण केली, पण दीर्घकाळ त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. या काळात त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि घराचे भाडे भरणेही कठीण झाले…

Read More

विधान परिषद निवडणूक सुरू, पहिल्या दिवशी १६ नामांकनांची उचल:पोटे, देशमुख, जगताप यांच्या नावांचा समावेश

अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार, २५ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी, विविध पक्षांतर्फे एकूण १६ अर्जांची उचल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे…

Read More

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहाद विरोधात आंदोलन:संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रास्ता रोको

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहादच्या चर्चांनंतर आता राज्यात ‘ट्रॅव्हल्स जिहाद’ नावाचा नवा प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या कथित जिहादच्या विरोधात आणि हिंदू महिलांच्या सुरक्षेसाठी आज अहिल्यानगरमध्ये हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात नगर-पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक येथे भव्य ‘रास्ता रोको’…

Read More