Headlines

Akola Additional Collector Pramod Gaikwad Suspended Over Extortion Case


अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी 15 हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर थेट निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे.

.

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खाणमालकांकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी करत त्यांना धमकावल्याचा आरोप होता. खाण व क्रशर मालकांनी या प्रकरणी 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गायकवाड यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे अकोल्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी या प्रकरणी प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर सरकारने प्रमोद गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते.

त्यानंतर आता सरकारने थेट प्रमोद गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. निलंबन काळात गायकवाड यांचे मुख्यालय अकोला जिल्हाधिकारी कार्यालय असेल. त्यांना पूर्वसूचनेशिवाय अकोला मुख्यालय सोडता येणार नाही.

नेमके प्रकरण आहे तरी काय?

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या असंख्य खाणी आहेत. या खाणींमधून दगड, गिट्टी, मुरूम काढला जातो. त्यापोटी गौण खनिज विभागाला स्वामित्वधन शुल्क प्राप्त होते. महसूल विभागाकडून गौण खनिज विभागाला वसुलीचे लक्ष्य दिल्या जाते. मार्च महिन्यात स्वामित्व शुल्क वसुलीची लगबग सुरू असताना खाण मालक संघटनेने अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता.

खाणी बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही आरोप

प्रमोद गायकवाड यांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. संघटनेच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले. पैशांची मागणी केली. काही ठिकाणी स्वत: जाऊन वसुली देखील केली. सर्व खाणी बंद पाडण्याची धमकी सुद्धा दिली. अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा…

भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. वाचा सविस्तर

अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना

धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.