Headlines

पीएम व्हिजन टू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा:युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता – मंत्री आशिष शेलार

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार…

Read More

खडसे साहेबांनी पक्षासाठी जीव लावून काम केलं:पुनरागमनाच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांची मोठी प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदावरही स्पष्टच बोलले

भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “भारतीय जनता पक्ष वाढवण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे, त्यापैकी एकनाथ खडसे हे एक आहेत. त्यांनी पक्षासाठी जीव लावून काम केले,” असे म्हणत मुनगंटीवार यांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला. मात्र, खडसे यांच्या…

Read More

ममता बॅनर्जी यांचा भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल:भाजपचे सुवेंदु अधिकारी येथून उमेदवार; आसाम-केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रचार थांबला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने या जागेवरून सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. ते विरोधी पक्षनेतेही आहेत. सुवेंदू यांनी २ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह त्यांच्यासोबत उपस्थित होते. भवानीपूर व्यतिरिक्त, नंदिग्राममध्येही ममता आणि सुवेंदू यांच्यात लढत आहे, जिथे…

Read More

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात…

Read More

नवागतांचे स्वागत, प्राचार्यांचा कानमंत्र; महाविद्यालयात रंगला खास ‘दीक्षारंभ':11 जुलैपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन, सांस्कृतिक उपक्रमाची सफर‎

स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे २०२६-२७ च्या नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ करण्यात आला. दीक्षारंभ नावाने सुरु झालेल्या या नव्या शैक्षणिक सत्रात नवागतांचे स्वागत करुन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही हितोपदेश केला. महाविद्यालयाने सुरु केलेला हा दीक्षारंभ आगामी ११…

Read More

शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे . आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी…

Read More

खरीप आढावा बैठकीत अंबादास दानवेंचा आक्रमक पवित्रा:खतटंचाई आणि बियाणे लिंकिंगवरून प्रशासनाला इशारा; कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवार, 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व तयारी आढावा संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक कर्ज वितरणातील अडचणी आणि बियाण्यांच्या संभाव्य लिंकिंगप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत खरीप हंगामात खतटंचाई आणि पीक कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो…

Read More

CBSE चा निर्णय, तिसऱ्या भाषेत बोर्ड परीक्षा होणार नाही:त्रि-भाषा धोरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एकदाची सूट

CBSE ने सोमवारी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत त्रि-भाषा धोरण लागू करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या 10वीच्या विद्यार्थ्यांवर त्रि-भाषा धोरण लागू होणार नाही. तसेच, सध्या 7वी, 8वी आणि 9वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीत पोहोचल्यावर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. CBSE च्या शैक्षणिक संचालक प्रज्ञा एम सिंह…

Read More

Uttan Cannonball Found; NSG & Police Joint Operation Averts Disaster

मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरात मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला एक जिवंत आणि स्फोटकयुक्त जुना तोफगोळा (Cannonball) आढळून आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मीरा-भाईंदर पोलिस . स्थानिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन भागातील काही नागरिकांना जमिनीत एक संशयास्पद धातूची वस्तू दिसली. त्यानंतर त्यांनी…

Read More

सरकार इतकं असंवेदनशील का?:सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, संसदेत सरकारला घेरण्याचा इशारा

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी २० दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आगामी २० तारखेला संसदेचे कामकाज…

Read More