Headlines

'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय तुमच्या बापाची जहागीर आहे का?':रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर जोरदार पलटवार; महाराष्ट्रात राजकारण तापले




राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन केले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून कॉकरोच जनता पार्टीवर तसेच या आंदोलकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत, बापाचा माल आहे का? अशा शब्दांत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आंदोलकांवर टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार दिले आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय? देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते. देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका, असे खडसे यांनी म्हटले आहे. काय म्हणाले होते अतुल भातखळकर? आंदोलकांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर अतुल भातखळकर म्हणाले, कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेले आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. पोलिसांचा लाठीचार्ज अत्यंत निषेधार्ह दरम्यान, दिल्लीत जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्याची घटना घळदी होती. यावर रोहिणी खडसे यांनी आपला निषेध नोंदवला आहे. त्या म्हणाल्या, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत मत मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकाराला लाठीच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, लोकशाहीवर हल्ला आहे. पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, तरुणांच्या हातात रोजगार, शिक्षण आणि भविष्याची हमी देण्याऐवजी त्यांच्या हातात जखमा देण्याचे काम होत असेल, तर हा लोकशाहीचा नव्हे तर दडपशाहीचा मार्ग आहे. सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *