चांदूर बाजारमध्ये रस्ता उखडला, खड्डे वाढले:विद्यार्थी, रुग्णांसह वाहनधारकांना अपघाताचा धोका
चांदूर बाजार शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. हा मार्ग चांदूर बाजार-वलगाव रस्त्यावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जातो…