अकोला बाजार समितीत हळदीची आवक सुरू:आठवड्यातून प्रत्येक बुधवारी, शनिवारी होणार लिलाव
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या लिलावात हळदीला क्विंटलमागे १३६०१ रुपयांचा दर मिळाला. शेतकऱ्यांना क्विंटलमागे १०,६०० रुपये ते १३,६०१ रुपयांदरम्यान दर मिळाला. बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या उपस्थितीत लिलावाला सुरुवात झाली. हळदीचे लिलाव सुरू करण्यासाठी अनिल जैन, महावीर जैन, तुषार घुगे आदींनी सहकार्य केले. किशोर सरोदे, दीपक देवकर,…