![]()
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या लिलावात हळदीला क्विंटलमागे १३६०१ रुपयांचा दर मिळाला. शेतकऱ्यांना क्विंटलमागे १०,६०० रुपये ते १३,६०१ रुपयांदरम्यान दर मिळाला. बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या उपस्थितीत लिलावाला सुरुवात झाली. हळदीचे लिलाव सुरू करण्यासाठी अनिल जैन, महावीर जैन, तुषार घुगे आदींनी सहकार्य केले. किशोर सरोदे, दीपक देवकर, प्रभाकर देवकर, अरुण देवकर, शुभम इंगळे, शुभम राखोंडे, रणजीत सर्जेराव या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणला, त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिरीष धोत्रे, राजीव शर्मा, चंदू चौधरी, सतीश तोष्णीवाल, अतुल जैन, अतुल राठोड, जितेंद्र थोरात, महेश मुंदडा आदींसह बाजारातील खरेदीदार, आडते, बाजार समितीचे सचिव सुनील मालोकर उपस्थित होते. आडते, खरेदीदारांच्या वतीने शिरिष धोत्रे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जितेंद्र थोरात, शिरीष धोत्रे यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी हळदीचे लिलाव सुरू केल्याबद्दल आभार मानले. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होत असून दूरपर्यंत शेतमाल विक्रीला नेण्याची त्यांची अडचण दूर झाली आहे. लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीचे पर्यवेक्षक सुनील ठोकळ, सागर काळे, गौरव खेडकर, किशोर गाडगे यांनी लिलाव सुरु करण्यासाठी परिश्रम घेतले. हळदीचा लिलाव हे बुधवार व शनिवार या दोन दिवशी होणार आहेत. शेतकऱ्यांनी आडत्यांसोबत संपर्क साधून शेतमाल विक्रीला आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
Source link
अकोला बाजार समितीत हळदीची आवक सुरू:आठवड्यातून प्रत्येक बुधवारी, शनिवारी होणार लिलाव