Headlines

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे…

Read More

नवीन पार्सल बंद:कंत्राटदाराचा करार रद्द झाल्याने राज्यात एसटी पार्सल सेवा ठप्प, एसटी पार्सल कार्यालये ताब्यात

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पार्सल वाहतूक सेवेसाठी हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी या कंपनीला दिलेले कंत्राट अचानक रद्द केले आहे. शुक्रवारी, १९ जून रोजी हा करार संपुष्टात आणल्याने राज्यभरातील एसटीची पार्सल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या केवळ जुनी पार्सल वितरित केली जात असून नवीन पार्सल स्वीकारणे बंद झाल्यामुळे व्यावसायिक, व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांची मोठी…

Read More

समन्सला दांडी मारणे पडले महाग:21 अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक

विविध गुन्ह्यांत न्यायालयाने वारंवार समन्स आणि वॉरंट बजावूनही साक्षीसाठी हजर न राहणाऱ्या आरोपी आणि साक्षीदारांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांनी मोहीम उघडली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या २१ फरार व प्रलंबित आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. या अटक केलेल्या आरोपींची न्यायालयाने थेट येरवडा आणि इतर विविध कारागृहात रवानगी केली आहे. श्रीगोंदे, बारामती, जुन्नर आणि दौंड येथील…

Read More

खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत

संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14…

Read More

पैशांनी विकत घेता येणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत:पक्षांतराच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया, संजय राऊतांबद्दलही मोठं वक्तव्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना परभणीचे खासदार संजय हरिभाऊ जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच कार्यकर्ते पैशांनी विकत घेता येत नाहीत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. “माझे कार्यकर्ते मनापासून साथ देणारे” परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय जाधव म्हणाले, “माझं माझ्या कार्यकर्त्यांवर…

Read More

आरोग्यवर्धिनी केंद्र कष्टकरी, असंघटित कामगारांसाठी ठरतेय मोठा आधार:रामवाडीत मोफत शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद, रक्त तपासण्यांसह समुपदेशन‎

येथील रामवाडी परिसरात जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, संपूर्ण सुरक्षा केंद्र, सुरक्षा क्लिनिक तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र (रामवाडी-सर्जेपुरा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील . या प्रसंगी रोहिणी बोरुडे (स्टाफ नर्स), डॉ. आकांक्षा हराळे, नीता उडानशिवे, सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे, विनय इदे (समुपदेशक), सागर फुलारी (व्यवस्थापक, संपूर्ण सुरक्षा…

Read More

दांडीबहाद्दर मंत्र्यांना फडणवीसांची कडक तंबी!:'सभागृह थांबलं तर खपवून घेणार नाही'; बेताल वक्तव्यांवरही नाराजी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत शिस्तीचा डोस दिला आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज ठप्प होणार असेल, तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काही मंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या…

Read More

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि…

Read More

बेलापुरात 9 जुलैला विसावणार निवृत्तीनाथांची पालखी:लाडक्या घोड्याने ठरवलेला वारीचा मार्ग; बेलापूर बु. ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांची बैठक‎

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचे ९ जुलै रोजी बेलापूर (बु.) येथे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिर . बेलापूर येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात या पालखीचा मुक्काम होतो. यावेळी सोपानराव हिरवे, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना…

Read More

सेन्सेक्स 50 अंकांनी घसरून 77,000 वर:निफ्टी 10 अंकांनी घसरला; मेटल आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

आज म्हणजेच मंगळवार, 23 जून रोजी सेन्सेक्स 50 अंकांनी (0.07%) घसरणीसह 77,000 वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 10 अंकांनी (0.06%) खाली आहे, तो 24000 च्या जवळ आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. कॉर्डेलिया क्रूझ चालवणाऱ्या कंपनीचा IPO आजपासून खुला भारतात ‘कॉर्डेलिया क्रूझ’ या ब्रँड नावाने सागरी क्रूझचे संचालन करणाऱ्या…

Read More