Headlines

नवीन पार्सल बंद:कंत्राटदाराचा करार रद्द झाल्याने राज्यात एसटी पार्सल सेवा ठप्प, एसटी पार्सल कार्यालये ताब्यात




महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पार्सल वाहतूक सेवेसाठी हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी या कंपनीला दिलेले कंत्राट अचानक रद्द केले आहे. शुक्रवारी, १९ जून रोजी हा करार संपुष्टात आणल्याने राज्यभरातील एसटीची पार्सल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या केवळ जुनी पार्सल वितरित केली जात असून नवीन पार्सल स्वीकारणे बंद झाल्यामुळे व्यावसायिक, व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाची पार्सल सेवा गेल्या २० वर्षांपासून अखंड सुरू होती. राज्यातील सुमारे ३०० बसस्थानकांवर कंत्राटदाराचे दीड हजारांहून अधिक कर्मचारी काम करत होते. मात्र, एसटीच्या नियोजन व पणन विभागाने पत्र काढून कंपनीचा करार संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात पार्सल कार्यालयांचा ताबा घेण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाने सुरू केली. नवीन परवानाधारकाची नियुक्ती होईपर्यंत ही सेवा एसटीच्याच नियंत्रणाखाली राहणार आहे, असे एसटी महामंडलाचे संभाजीनगर येथील विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले. औषधे, महत्त्वाची कागदपत्रे अडकली एसटीच्या पार्सल सेवेवर अनेक लहान-मोठे व्यावसायिक आणि उद्योजक अवलंबून आहेत. मात्र, अचानक पार्सल सेवा ठप्प झाल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे, औद्योगिक साहित्य आणि जीवनरक्षक औषधे वेळेत पोहोचत नाहीत. माल अडकून पडल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने कंत्राटदाराचा करारच रद्द एसटीने हेनेक्स इंटरनॅशनल कंपनीला कंत्राटाचा कालावधी ३० नोव्हेंबर २०२७ पर्यंत होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराने करारातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी एसटी प्रशासनाकडे आल्या होत्या. याच कारणावरून प्रशासनाने ही कठोर कारवाई करत कंत्राट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *