Headlines

मराठी रंगभूमीला कलात्मकतेची नवी दिशा हवी:श्रीराम लागू नाट्य महोत्सवातील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडले विचार

मराठी रंगभूमी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, मानवी जीवनाचे सखोल आकलन करून घेणारी आणि नव्या काळातील आव्हाने पेलणारी कलात्मक दिशा घ्यावी, असा सूर एका परिसंवादात उमटला. श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवांतर्गत ‘मराठी रंगभूमी – काल, आज, उद्या’ या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित पहिल्या श्रीराम…

Read More

संभाजीनगरात ‘एफएसएसएआय’चे नामांकित हॉटेल्स, मॉल्सवर छापे:पथक 2 दिवसांपासून मुक्कामी, अन्नपदार्थांचे नमुने जप्त

केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) विशेष पथकाने शहरात अचानक धडक मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पथकाने शहरातील नामांकित हॉटेल्स आणि प्रमुख मॉल्समध्ये छापे टाकून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कारवाईदरम्यान पथकाने थेट हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात जाऊन अन्नपदार्थ, स्वच्छता आणि…

Read More

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना

छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत…

Read More

अकोल्यातील 'सिटी हॉस्पिटल'ला भीषण आग:रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

अकोला शहरातील अत्यंत गजबजलेला मध्यवर्ती भाग असलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या वेळी ही आग भडकली, तेव्हा या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण दाखल होते. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने…

Read More

Thackeray Meeting Missed by 4 MLAs; Operation Tiger Buzz

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन . शिवालयात ठाकरेंची आमदारांसोबत महत्त्वाची बैठक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची बैठक घेतली. अधिवेशनादरम्यान पक्षाची भूमिका,…

Read More

‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा‎

शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील दहा महिन्यांपासून धोकादायक ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक…

Read More

बंदी असतानाही अंजनगाव तालुक्यात एचटीबीटी बियाणे लागवडीचा इशारा:शेतकरी संघटनेने दिले प्रशासनाला निवेदन, दुटप्पी धोरणाचा आरोप‎

तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. . शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव मोहोळ यांचे निधन:कुस्ती अन् सहकार क्षेत्रातील योगदानाने उमटवली होती छाप

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. 18 जून) रात्री 10:20 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबासह पुणे शहर आणि राजकीय-सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे. किसनराव मोहोळ यांनी आपल्या सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाने समाजातील एक मोठा समुदाय…

Read More

दाटेगाव शिवारात 263 झाडांना पाय फुटले?:टाटा पॉवरकडून झाडांची कत्तल, वन विभागाचा अहवाल; झाडे तोडली नसल्याचा कंपनीचा दावा

हिंगोली तालुक्यातील दाटेगाव, लोहगाव भागात सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी टाटा पॉवर कंपनीकडून २६३ झाडांची विना परवानगी कत्तल केल्याचे वन विभागाच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर हि पाहणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे टाटा पॉवरने आम्ही झाडे तोडलीच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे झाडे तोडली कोणी हा संशोधनाची भाग झाला असून तुर्तास तरी २६३ झाडांना…

Read More

जिथे नोटा उडाल्या, तिथे ED 2 रिकाम्या बॅग घेऊन पोहोचली:चौकशीत नाव समोर आल्यानंतर अमन अरोरा एकटे पडले; खरडच्या EO ची बदली

पंजाबमधील 2 रिअल इस्टेट ग्रुप्सवर ईडीने छापा टाकला. शुक्रवारी मोहालीच्या खरड येथील वेस्टर्न टॉवरमध्ये ईडीचे अधिकारी दोन रिकाम्या पिशव्या घेऊन येताना दिसले. याच टॉवरच्या 9व्या मजल्यावरून गुरुवारी रोख रकमेच्या पिशव्या खाली फेकण्यात आल्या होत्या. एक पिशवी फाटल्याने 500 रुपयांच्या नोटा हवेत उडताना दिसल्या. दुसरीकडे, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP) चे प्रदेशाध्यक्ष…

Read More