शिर्डी लिंगनिदान, गर्भपात रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत:निफाडमधून दोघांना अटक, रॅकेटमध्ये आतापर्यंत 18 आरोपी गजाआड; त्यात 6 डॉक्टरांचा समावेश
राहाता तालुक्यात उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या रॅकेटचे धागेदोरे आता नाशिक जिल्ह्यातील निफाडपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी तेथून आणखी दोघांना अटक केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण आंतर जिल्हा रॅकेटमध्ये आतापर्यंत तब्बल 18 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यात 6 डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ…