Headlines

शिर्डी लिंगनिदान, गर्भपात रॅकेटचे धागेदोरे ‎नाशिकपर्यंत:निफाडमधून दोघांना अटक‎, रॅकेटमध्ये आतापर्यंत 18 आरोपी गजाआड; त्यात 6 डॉक्टरांचा समावेश‎




राहाता तालुक्यात उघडकीस‎ आलेल्या अवैध गर्भलिंग निदान‎ चाचणी व बेकायदेशीर गर्भपात‎ प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.‎ या रॅकेटचे धागेदोरे आता नाशिक ‎जिल्ह्यातील निफाडपर्यंत पोहोचले‎ आहे. पोलिसांनी तेथून आणखी‎ दोघांना अटक केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण आंतर जिल्हा रॅकेटमध्ये‎ आतापर्यंत तब्बल 18 आरोपी‎ पोलिसांच्या जाळ्यात अडकले‎ आहेत. त्यात 6 डॉक्टरांचा समावेश‎ असल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी‎ खळबळ उडाली आहे.‎ लोणी (ता. राहाता) पोलिस‎ ठाण्यात सुरुवातीला या प्रकरणी गुन्हा ‎दाखल करण्यात आला होता.‎ सुरुवातीच्या कारवाईत नेवासा येथील ‎डॉ. भणगे, दोन एजंट आणि सहा‎ कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक‎ करून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ‎आणि तीन चारचाकी वाहने जप्त‎ करण्यात आली होती.‎ पोलिस तपासाची व्याप्ती ‎वाढल्यानंतर ढगे नामक आरोपीकडून ‎दुसरे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त‎ केले. त्यानंतर श्रीरामपूर येथील डॉ.‎कुटे व डॉ. शेख यांना बेकायदेशीर‎ चाचण्या आणि गर्भपात केल्याच्या ‎आरोपाखाली अटक करण्यात ‎आली. तपास पुढे सरकल्यावर पुणे‎ येथील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय‎ साहित्य विक्री करणाऱ्या एका‎ व्यक्तीला अटक करण्यात आली; हे ‎आरोपी बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी‎ मशीन विकत असल्याचे उघड झाले.‎ त्यानंतर वडगाव मावळ येथील‎ मारुती ढोरे याच्याकडूनही अवैध ‎मशीन जप्त करण्यात आले.‎ वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू‎ असताना, पुण्यातील आरोपींकडून‎ नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील‎ दोघांनी बेकायदेशीर सोनोग्राफी‎ मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.‎ श्रीरामपूरचे अप्पर पोलिसअधीक्षक‎ सोमनाथ वाकचौरे यांच्या विशेष‎ पथकाने पहाटे निफाड परिसरातून डॉ.‎कुणाल प्रभाकर वल्टे (वय 33),‎सागर शांताराम उल्हाळ (वय 25)‎यांना ताब्यात घेतले. डॉ. वल्टे हे‎ बीएएमएस डॉक्टर असून ‎करंजगाव येथे दवाखाना‎ चालवितात. ते आधी अटक‎ झालेल्या डॉ. भणगे यांचे वर्गमित्र ‎आहेत. तर उल्हाळ हा नांदूर‎मधमेश्वर येथील रहिवासी असून‎ त्याची ब्लड टेस्टिंग लॅब आहे. डॉ.‎वल्टे यांनी बेकायदेशीर मशीन याच ‎लॅबमध्ये लपवून ठेवण्यासाठी दिले‎ होते. न्यायालयाने या दोन्ही ‎आरोपींना चार दिवसांची पोलीस‎ कोठडी सुनावली.‎ या संपूर्ण कारवाईत वेगवेगळ्या‎ जिल्ह्यांतून एकूण 4 बेकायदेशीर‎ सोनोग्राफी मशिन्स आणि 3 चारचाकी‎ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ‎जिल्हा पोलिस अधीक्षक एम.‎सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ‎सोमनाथ वाकचौरे यांच्या ‎मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती‎व सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे ‎या प्रकरणाचा पुढील सखोल तपास‎ करत आहेत.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *