"अहिल्यानगर महिला प्रीमियर लीग''चे शिवराज वॉरियर्सचे विजेते:क्रीडा केडगावमध्ये ७ एकरात उभारणार क्रिकेट स्टेडियम : आ. जगताप
प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस. के. क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर महिला प्रीमियर लीग’चा थरार शिवराज वॉरियर्सच्या विजयाने संपुष्टात आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात शिवराज वॉरियर्सने जी एन एस नाईट रायडर्सचा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम लढतीत जी एन एस नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद…