यमाई तलाव ट्रॅकची दुरवस्था, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:पंढरपूर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी
. पंढरपूर शहरातील नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरण्याचे मुख्य केंद्र असलेल्या यमाई तलाव ट्रॅक (उद्यान) परिसराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात आता समस्यांचे साम्राज्य निर्माण असून, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यमाई तलावाच्या भराव्यावर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुशोभिकरणही करण्यात…