.

पंढरपूर शहरातील नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरण्याचे मुख्य केंद्र असलेल्या यमाई तलाव ट्रॅक (उद्यान) परिसराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात आता समस्यांचे साम्राज्य निर्माण असून, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यमाई तलावाच्या भराव्यावर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुशोभिकरणही करण्यात आल्याने शहरातील नागरिकांचे हे विरंगुळ्याचे ठिकाण बनलेले होते. मात्र सध्या या ट्रॅकवर कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी, ट्रॅकच्या परिसरात जागोजागी कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि जनावरांची विष्ठा पडलेली दिसत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध हवेसाठी फिरायला येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे. स्वच्छतेअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या उद्यानाला कोणत्याही प्रकारचे मजबूत संरक्षक कंपाऊंड (भिंत) नाही. परिणामी, परिसरात मोकाट जनावरे सहजपणे घुसतात. फिरायला येणाऱ्या लहान मुलांच्या आणि वयस्कर नागरिकांच्या अंगावर ही जनावरे धावून जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच येथील बसण्यासाठी बनवलेले बाकडे पूर्णपणे तुटलेले असून पादचाऱ्यांसाठीचे पेव्हर ब्लॉकही फुटले आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडखळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पंढरपूर नगरपालिकेने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन उद्यानाची दुरुस्ती करावी, कचरा साफ सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या ट्रॅक परिसरातील वीज यंत्रणेची मुख्य डीपी पेटी उघड्या अवस्थेत पडलेली आहे. या भागात लहान मुले मोठ्या संख्येने खेळायला आणि फिरायला येतात. खेळता खेळता मुलांचा हात या उघड्या डीपीला लागल्यास मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ^आम्ही रोज या ठिकाणी आरोग्यासाठी फिरायला येतो, पण येथील दुरवस्था पाहून मनस्ताप होतो. उघडी डीपी आणि मोकाट जनावरे यामुळे जीवाला धोका निर्माण झाला . – महेश माने, नागरिक लवकरच गैरसोयी दूर करणार ^यमाई तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू होत आहे, निविदा प्रक्रिया सुरू आहे. विधानपरिषद आचार संहिता झाली की प्रक्रिया पूर्ण होईल. तरीही तातडीचे उपाय म्हणून मुख्याधिकारी यांच्यासह ट्रॅकची पाहणी करून गैरसोयी दूर करू. प्रणिता भालके, नगराध्यक्ष करावा, डीपी पेटी बंद करावी आणि झाडांना पाण्याची व्यवस्था करावी, ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडखळून पडण्याची भीती निर्माण झाली, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उघडी डीपी पेटी: नागरिकांना देते मृत्यूला आमंत्रण
जीवाला धोका निर्माण