![]()
अंजनगाव सुर्जी येथे ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी ‘शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून, सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,’ असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन तराळे होते. जळगावचे माजी अध्यक्ष दीपक कंडारे, राजेश तायवाडे (मध्यप्रदेश), ओंकार राऊत, विनोदराव डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरकर, ज्योत्स्ना करवाडे, आशा सायगन आणि श्रीराम वऱ्हाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नगराध्यक्ष गायगोले यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी दहावी आणि बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या २८ विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या ओम गजानन पटवी यांच्या आई-वडिलांचाही विशेष सत्कार करण्यात आला. हा उपक्रम समाजात एकोपा, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश तायवाडे यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन अध्यक्ष शिवकुमार पटवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश थोराईत, अमोल वऱ्हाडे, विजय तायडे, अक्षय तराळे, रुपेश तायडे आणि अनिल तराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश अढागळे, सुभाष पटवी, मनोज तराळे, राजेश तायवाडे, रवी तायडे, जया तायडे, कार्तिका तायडे, सोनाली अमोल वऱ्हाडे आणि सारिका तराळे यांच्यासह समाजबांधव, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुकेश वांद्रे (अध्यक्ष, ओतारी समाज संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी), अल्केश बरगट, अतुल राऊत, गौरव सातघोडे, हरीश राऊत, जान्हवी सातघोडे, मंगेश राऊत, पियुष ओतोकार, प्रमोद तायडे, सतीश काकडे, शुभम सायगण, तुषार खंडारे आणि सचिन अढागळे आदी समाजबांधवांनी आर्थिक सहकार्य केले.
Source link
शिक्षण हेच यशाचे खरे साधन, नगराध्यक्ष गायगोलेंचे प्रतिपादन:ओतारी समाज संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; पालकांचाही सत्कार