Headlines

मुंबई-बंगळुरू मार्गावर मालवाहू टेम्पोला आग:परदेशी फर्निचर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही




पुण्यातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात एका मालवाहू टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीत टेम्पोसह त्यातील परदेशी बनावटीचे महागडे फर्निचर जळून खाक झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी बाह्यवळण मार्गावरून जात असताना, वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतला. टेम्पोमध्ये परदेशी बनावटीचे फर्निचर होते. आग लागल्याचे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखत टेम्पो बाजूला घेतला आणि स्वतः बाहेर पडल्याने तो बचावला. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराज माने, नीलेश तांगुदे, सिद्धेश भगत, प्रतीक पांगसे आणि दत्ताराय शेटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाची चौकशी केली असता, तो मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन पुण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यात मध्यभागात वाहतूक बदल – छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (१९ एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. ‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. ‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणा आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *