हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का:3.5 रिश्टर स्केलची नोंद; जीवित किंवा वित्तहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी ता ३१ भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. हिंगोली तालुक्यातील माळधामणी शिवार भूकंपाचे केंद्रबिंदू असून भूकंप मापन केंद्रामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. यामुळे कुठेही जीवित वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येणे तसेच भूकंप जाणवण्याच्या घटना वाढत आहेत….