![]()
वेरूळ येथे श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमणकाळात त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. त्यांच्या स्मरणार्थ वेरूळ येथे चतुर्विधामठ स्थापन करण्यात आला. आठशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठावर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यास संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महानुभाव पंथाच्या वतीने सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांची ऋषीराज अंकुळणेकर, अभयराज अंकुळणेकर, सुभाष निकम, शिवा पवार, संतोषराजे जाधव, आकाश बोलधने, योगेश मातेरे, अनिल सिरसाठ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन वेरूळ येथील चतुर्विधा मठाच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमणकाळात आठशे वर्षांपूर्वी त्यांनी वेरूळ येथे दहा महिने वास्तव्य केले होते. याची स्पष्ट नोंद लीळाचरित्रात आहे. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी चतुर्विधामठ स्थापन करण्यात आला. या मठाला आठशे वर्षे झाली आहेत. हा मठ पूर्ण नमस्कारी होता. सध्या हा मठ जीर्ण-शीर्ण अवस्थेत आहे. काही समाजकंटक या मठावर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
Source link
वेरूळ येथील चतुर्विधा मठाला संरक्षण द्यावे:सहायक पोलिस अधीक्षक अग्निहोत्री यांना निवेदन