Headlines

PM मोदींच्या संपादित व्हिडिओ प्रकरणात मेटा-इंडियाच्या प्रमुखांवर FIR:दिल्लीतील आंदोलनानंतरचा व्हिडिओ, नोएडामधील महिलेवरही गुन्हा दाखल




हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एडिट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांसोबत मेटा इंडियाच्या प्रमुखांनाही सह-आरोपी (को-एक्यूज्ड) बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, नोएडा पोलिसांनीही पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी एका महिलेवर झिरो एफआयआर दाखल केला आहे. हैदराबादमध्ये 2 स्वतंत्र गुन्हे दाखल, मेटाला पोलिसांची नोटीस हैदराबाद पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया खात्यांच्या हँडलर्सना आरोपी बनवले आहे, तर मेटाच्या इंडिया प्रमुखांना दोन्ही प्रकरणांमध्ये सह-आरोपी म्हणून नामनिर्देशित केले आहे. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनापासून सुरू झालेला प्रकार पोलिसांच्या तपासानुसार, पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणारे हे आक्षेपार्ह आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पसरवले जात आहेत. हे आंदोलन कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते. पोलीस अधिकाऱ्याचे विधान: आरोपींचा शोध सुरू प्रकरणाचा तपास करणाऱ्या हैदराबाद सायबर क्राईमच्या एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही नोंदवलेल्या प्रकरणांबाबत आणि तक्रारदारांनी कळवलेल्या आक्षेपार्ह लिंक्सबाबत मेटाला नोटीस बजावली आहे. आम्ही आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी त्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.” नोएडामध्ये महिलेवर एफआयआर: पंतप्रधानांवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप दुसऱ्या एका प्रकरणात, जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरोधात कथितपणे अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल नोएडामध्ये एका महिलेवर झिरो एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. गाझियाबाद येथील रहिवासी स्मृती सिंह यांच्या तक्रारीवरून नोएडाच्या सेक्टर 168 येथील रहिवासी रुचिका सिंह यांच्या विरोधात एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS च्या 3 कलमांखाली गुन्हा दाखल, संवैधानिक पदाच्या अपमानाची तक्रार तक्रारीनुसार, आरोपी महिलेने 23 जुलै रोजी जंतर-मंतर येथे पंतप्रधानांविरोधात “अश्लील आणि आक्षेपार्ह” भाषेचा वापर केला होता. यामुळे संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आणि समाजात द्वेष पसरवण्याचा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी महिलेवर BNS च्या कलम 352 (शांतता भंग करण्यासाठी चिथावणी देणे), 353(1) (सार्वजनिक उपद्रवाशी संबंधित विधाने) आणि 356(1) (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. झिरो एफआयआर म्हणजे काय? सामान्यतः, जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा घटनेच्या क्षेत्राधिकार असलेल्या पोलीस ठाण्यातच एफआयआर (FIR) दाखल केला जातो. परंतु ‘झिरो एफआयआर’ अंतर्गत पीडित कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतो, जरी तो गुन्हा त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला नसला तरी. नंतर हा एफआयआर तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *